आपल्या डोळ्यात असणारे नैसर्गिक भिंग धूसर झाल्यास त्यास मोतीबिंदू (contact) म्हणतात.मोतीबिंदू झालेल्या रुग्णाची नजर हळूहळू अंधुक होते.मोतीबिंदूची अनेक कारणे आहेत.
मोतीबिंदुमुळे नजर कमी होते व त्यावर ऑपरेशन हाच एकमेव ईलाज आहे. चष्मा किंवा औषधीमुळे मोतीबिंदू बरा होत नाही.
मोतीबिंदूचे ऑपरेशन वेगवेगळ्या प्रकारे करता येते.व त्यात वेगवेगळी भिंगे (IOL) वापरता येतात.
ऑपरेशनचे प्रकार खालील प्रमाणे आहेत.
टॉपीकल फेकोचे फायदे:
वरील सर्व वैशिष्ट्यामुळे दृष्टी आय इंस्टीट्यूट हा मोतिबिंदु शस्त्रक्रियेसाथी सर्वोत्तम पर्याय रुग्णापुढे आहे.
We are the Best & safest & the most Advanced Center for cataract surgery.
डोळ्यातून मोतीबिंदू काढल्यानंतर सर्वसाधारण परीस्थितीत कृत्रिम भिंगारोपण केले जाते.काही वेळा लेन्स टाकण्यास लागणाऱ्या सपोर्टमध्ये कमजोरी असल्यास किंवा शस्त्रक्रिये दरम्यान कमजोरी निर्माण झाल्यास लेन्स टाकण्यात येत नाही.
लेन्सचे विविध प्रकार आज उपलब्ध आहेत.जसे हॉटेलमध्ये आपणास मेनूकार्ड देतात तसेच हे लेन्सचे IOL menu card आहे.हे रुग्णास गांगरून टाकण्यासाठी नसून त्यांना शस्त्रक्रियेपूर्वी पूर्ण माहिती देण्यासाठी आहे.
वयाच्या चाळीस वर्षापूर्वी आपणास दूर व जवळचे दिसते पण चाळीसीनंतर मात्र जवळचे पाहण्यासाठी वेगळा नंबर लावावा लागतो .त्यास Presbyopia म्हणतात.मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर Monofacal lens ने आपणास दूरचे शक्यतो बिना चष्म्याने दिसते पण जवळसाठी नंबर वापरावाच लागतो .म्हणजेच मोनोफोकल लेन्स आपली फक्त दूरची दृष्टी स्पष्ट करू शकतो व ऑपरेशन नंतर नंबरचा चष्मा अनिवार्य असतो .
विविध प्रकारचे मोनोफोकल लेन्स खालील प्रमाणे आहेत.
आता टेक्नोलॉजीतील अत्याधुनिक प्रगती मुळे आपणास मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर स्पष्ट तर दिसतेच पण तेही बिना चष्म्याने आता टोरिक आणि मल्टीफोकल लेन्स सिस्टीममुळे मोतीबिंदूच्या ऑपरेशन वेळीच चष्म्याचा नंबर पुर्णपणे घालवता येतो.यासच मोतीबिंदू रिफ्रॅक्टीव्ह शस्त्रक्रिया म्हणतात.
SIMULATED VISION
SIMULATED VISION
© 2015 Drushti Eye Institute Pvt Ltd. All Rights Reserved
Developed by - Regal Soft India