"Donate Eyes (नेत्रदान करा)"

Services

Paediatric Ophthalmology & Squint

अम्ब्लायोपिया(आळशी डोळा)


डोळा आळशी म्हणजे काय?

डोळ्यांची संरचना व्यवस्थित असूनही डोळ्यांमध्ये दृष्टी कमी आसने ह्याला अम्ब्लायोपिया अथवा आळशी डोळा असे म्हणतात.


डोळ्यामध्ये दृष्टी कमी असण्याची कारणे कोणती?

जन्माच्या वेळी,आपल्याला संपूर्ण दृष्टी नसते जस जसे बाळ मोठे होते तस तसे त्याच्या दिसण्याच्या प्रक्रियेवर सुधारणा होत असते आणि हि सुधारणा होणे हे तो पाहत असतांना वस्तूची प्रतिमा कशी बनत आहे ह्यावर दृष्टीची परिपक्वता अवलंबून असते. वयाच्या सुरवातीच्या काळात जर काही दोष असल्यास दृष्टी परिपक्व होत नाही अर्थात वाढत नाही यालाही अम्ब्लायोपिया असे म्हणतात.

  • खूप मोठा दृष्टीदोष अर्थात चष्म्याचा नंबर असणे.
  • दोन्ही डोळ्यांच्या चष्म्याच्या नंबरमध्ये खूप फरक असणे.
  • डोळ्यांमध्ये तिरळेपणा असणे.
  • लहानपणापासून डोळ्यांमध्ये मोतीबिंदू आसणे.
  • पापणी जरुरीपेक्षा जास्त खाली असणे(टोसिस)
  • नियोजित वेळेच्या आधीच बालकाचा जन्म होणे.
  • अनुवंशिकता
  • लहानपणीच डोळ्याला आजार होणे.

दृष्टी परिपक्व होण्यासाठी दोन्हीही डोळ्यांमध्ये वस्तूंची स्पष्ट प्रतिमा मिळणे खूप आवश्यक असते. दोन्ही डोळ्यांमध्ये खूप मोठा चष्मा असल्यास किंवा दोन्ही डोळ्यांच्या चष्म्याच्या नंबरमध्ये खूप फरक असल्यास,वस्तूची प्रतिमा खूप धूसर अस्पष्ट बनते आणि योग्य चष्मा न लावल्यास डोळ्याची दृष्टी वाढत नाही म्हणजेच डोळा आळशी बनतो.

तिरळेपणात, मेंदूकडे दोन वेगवेगळ्या प्रतिमा तयार होतात. तिरळ्या डोळ्यांकडून येणाऱ्या प्रतिमेकडे मेंदू दुर्लक्ष करतो आणि त्यामुळे तो डोळा आळशी बनतो.

मोतीबिंदू असल्यावर किंवा काचबिंदू असल्यास त्या डोळ्यात प्रतिमाच न बनल्यामुळे तो डोळा आळशी बनतो. लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे पेशंट जेवढा वयाने लहान तेवढा डोळा आळशी होण्याचे प्रमाण जास्त आणि त्याचे गांभीर्य देखील जास्त असते.


योग्य वेळी आणि लवकरात लवकर संपूर्ण इलाज केल्यास डोळ्याचे आळशीपण पूर्णपणे घालवता येऊ शकते.

इलाज सुरु करण्यास जेवढा उशीर होतो तेवढेच इलाज यशस्वी होण्याचे प्रमाण कमी कमी होत जाते.

पेशंटच्या संपूर्ण कुटुंबाचे सहकार्य तसेच मानसिक तयारी खूप महत्वाची असते.

अम्ब्लायोपिया लवकरात लवकर उपचार न केल्यास आणि संपूर्ण उपचार न केल्यास , नंतर दृष्टी कधीही वाढल्यास जाऊ शकत नाही.

आळशी डोळ्यासाठी काय उपचार आहेत?

सर्वप्रथम, डोळा आळशी होण्यामागे असलेल्या कारणांचा शोध घेणे आवश्यक आहे.त्यासाठी पिडीयाट्रीक ऑफ्थ्यॅल्मोलॉजीस्टद्वारे डोळ्यांची संपुर्ण,सुयोग्य तपासणी होणे आवश्यक आहे.

  1. चष्मा: डॉक्टरांनी दिलेल्या चष्म्याचा वापर करणे.
  2. शस्त्रक्रिया: लहानपणापासून मोतीबिंदू असल्यास सर्वप्रथम मोतीबिंदूवर शस्त्रक्रिया करणे अत्यंत आवश्यक आहे.

पापणी खाली असल्यास पापणी वर करण्याची शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे.

आळशी असलेल्या डोळ्याचाच जास्तीत जास्त वापर करणे,जेण ेकरून त्याची दृष्टी वाढण्यास चालना मिळावी हे अत्यंत आवश्यक आहे.

त्यासाठी चांगला डोळा (ज्यामध्ये दृष्टी चांगली आहे) बंद करण्याची पद्धती अवलंबिली जाते. यालाच ऑक्ल्युजन थेरपी अथवा पॅचिंग थेरपी असे म्हणतात.


बालनेत्ररोगतज्ञ,पेशंटचे वय आणि अम्ब्लायोपियाच्या प्रकारावर पॅचिंग थेरपी कशी आणि किती द्यावयाची ते ठरवतात.

पॅचिंग थेरपी चालू असताना डॉक्टर जेंव्हा जेंव्हा बोलवतात तेंव्हा तेंव्हा येऊन डोळ्यांची दृष्टी तपासणे आवश्यक असते.डोळ्यांवर पट्टी लावून बंद करणे हा पेशंटसाठी सुखद अनुभव नसतो त्यामुळे सुरवातीला मुले त्रास देतात.

आळशी डोळ्यातील दृष्टी जस जसी वाढू लागते तस तसे हे त्रास देण्याचे प्रमाण कमीकमी होत जाते.

  • डोळा बंद करण्यासाठीची पट्टी पूर्णपणे लावणे आवश्यक आहे.
  • डोळा थोडा देखील उघडा राहता कामा नये.
  • डोळ्यावर पट्टी लावल्यानंतर आळशी डोळ्याचा जास्तीत जास्त वापर करावा. त्यासाठी मुलांच्या आवडीनुसार, लिहिणे, वाचणे, चित्र काढणे, टी.व्ही. पाहणे, रंगवणे अशा गोष्टी त्यांना करु द्याव्यात.
  • डॉक्टरांनी सांगितल्यावर त्यानुसार काटेकोरपणे पट्टीचा उपचार बंद करू नये.
  • डॉक्टरांनी बोलावल्यावर नियमितपणे तपासनीस यावे.
नेहमी विचारले जाणारे प्रश्न :

  • कधीपर्यंत हा उपचार चालणार ?
  • पेशंटचे वय आणि अम्ब्लायोपियाचा प्रकार या दोन गोष्टींवर उपचार किती चालेल हे अवलंबून असते. याशिवाय पालक किती नियमितपणे सांगितलेला उपचार करतात ह्यावरही ते अवलंबून आहे. सहसा हा उपचार महिनो – महिने तर कधी कधी वर्ष वर्ष चालतो.

  • वयाच्या कितव्या वर्षापर्यंत ह्याचा फायदा होतो ?
  • या प्रश्नाचे उत्तर देणे तसे अवडघ आहे. वयाच्या ८ ते ९ वर्षापर्यंत सहसा ह्याचा खात्रीदायक फायदा होतो परंतु कधी कधी त्यानंतर ह्या उपचाराने दृष्टी वाढल्याची उदाहरणे आमच्या रिसर्च मध्ये सापडतात. तुमचे डॉक्टर यावर तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील.

  • हा उपचार कधी आणि कसा बंद करणार ?
  • दोन्ही डोळ्यांची दृष्टी ६/६ अथवा एकसारखी होणे हे आपले उद्दिष्ट असते. दोन्ही डोळ्यांची दृष्टी एकसारखी झाली की हा उपचार कमी करता येतो परंतु कुठल्याही परिस्थितीत हा उपचार अचानकपणे बंद केला जात नाही.

    तुमचे नेत्रतज्ञ याबाबत तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील.

  • दृष्टी वाढलीच नाही तर ?
  • तुमचे डॉक्टर, व्यवस्थित तपासणी करून, पूणर्तपासणी करून पॅचिंग थेरपी बंद करण्याबाबत निर्णय घेतील.

  • पट्टी न लावता दृष्टी वाढविणे संभव आहे का ?
  • पॅचिंग थेरपी ही एक समय सिद्ध आणि हजारो वर्षाचा इतिहास असणारी प्रभावी उपचार पद्धती आहे त्यापेक्षा चांगली दुसरी कुठलीही पद्धत अस्तित्वात नाही. अगदी अत्यल्प प्रमाणात काही पेशंट्समध्ये पट्यांएवजी पिनलायझेशन पद्धतीचा उपयोग केल्या जाऊ शकतो. तुमचे नेत्रतज्ञ त्याबाबत निर्णय घेतील.

Our Services

© 2015 Drushti Eye Institute Pvt Ltd. All Rights Reserved

Developed by - Regal Soft India